STORYMIRROR

Sanjana Kamat

Inspirational

3  

Sanjana Kamat

Inspirational

आरसा

आरसा

1 min
30

खरा आरसा दाखवा

भ्रष्टाचारी कामकाजा

गळे केसांनी कापती

सुशिक्षित गुंडाराजा

कूटनीती पैश्यांसाठी

संपत्ती ही दुष्कृत्यांची

जाणूनी कर्मसिध्दांत

फळे भोगीत कर्माची

दयनीय माणूसकी

मनी ईषा जळमट

सुखलोलुपता शौक

आयुष्याची फरकट

देह निर्जीव नारद

स्वार्थ अभिलाषा पोटी

मुखवटा दातृत्वाचा

आस मतलबी खोटी

मृत्यू समयी आरसा

चलचित्र नाचे डोही

मोहमाया खोटे आसू

निरपेक्ष आत्मा पाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational