STORYMIRROR

vaishali vartak

Inspirational

3  

vaishali vartak

Inspirational

गर्वाचे घर खाली

गर्वाचे घर खाली

1 min
239

लोभ, मोह मद दूर सारा

दिली संतानी शिकवण

गर्वाने, मदाने न, फुलता

जगी ह्याची, ठेवावी आठवण.


बालपणात ऐकलेल्या गोष्टीचे

ध्यानी ठेवावे जीवनी सार

नको कदा गर्व जीवनात

याचा ज्ञानाचा घ्यावा आधार


दुर्योधनाच्या मनीचा अती गर्व

ठरला त्याच्या विनाशास कारण

असूनी शूर महा योध्दा ज्याने

अंगीकारले नाही, सुनीतीचे धोरण


गर्व कशाचाच नसावा मनी

सदा राखावा माणुसकीचा धर्म

आज असे, उद्या नसे रुप पैसा

हेच जाणून घ्यावे जीवनाचे मर्म


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational