प्रिती
प्रिती
गोल गिरकी धरतीची
दिवसा आणि रात्रीची
कसे रहावे भान तिजला
दिसे पौर्णिमा चंद्राची
तऱ्हा आगळी गिरकीची
प्रहरांमधल्या बहरांची
सर्वांमध्ये तरल ठरे ती
वेळ साजिरी 'पहाटेची'
घागर भरली रात्रीची
वाट पहाते सूर्याची
'पहाटपाणी' शिंपून झाली
पूर्ण तयारी उदयाची
गुपितं शोधू बदलांची
आयुष्याच्या फिरकीची
सूर्य जपुनी उरी प्रीतीचा
सजवू 'पहाट' सोन्याची
