पंढरी
पंढरी
1 min
13.8K
नाम विठ्ठलाचे मुखी घेऊ या रं
चला लवकर पंढरी जाऊ या ।।धृ।।
आषाढ़ी एकादशी पंढरी वारी
भजन कीर्तन देवाच्या दारी
कान धरुन वाळवंटी नाचूया रं ।।
चंद्रभागेत करूया स्नान
पुंडलीकाचे घेऊया दर्शन
गजर विठ्ठलाचा करूया रं ।।
गोपाळपुऱ्यात गजर होतो
घेऊन पताका भक्त नाचतो
मुखी हरिनाम गाऊया रं ।।
चंदन बुक्का कापूर वाती
पांडूरंगाची करुन आरती
नेत्री सुख सोहळा पाहूया रं।।