STORYMIRROR

Anita Bodke

Inspirational

5.0  

Anita Bodke

Inspirational

माझी गझल

माझी गझल

1 min
27.4K


वेग वा-यासारखा, तो हारला होता कसा?

थांबले नाहीच कासव झोपला होता ससा!


आत डोकावून नाही पाहिले पण शोधते

हा असा का वागतो अन वागतो का तो तसा?


सहज नाही भेटलेले यश मला केव्हाच हे

टाकला नाही कधीही घेतलेला मी वसा!


राख उरते शेवटी हातात वेड्या जाण तू

चांगली नसतेच केव्हाही कशाची लालसा!


का असा झाला कळेना चेहरा माझा मला

का असा निरखून इतका पाहतो हा आरसा?


श्वापदाच्या सारखे हे वागणे नाही बरे

वाग आता माणसाच्या सारखा तू माणसा!


मी किती दुष्काळ सोसू? दे नभा पाऊस तू..

जीव कासावीस झाला कोरडा झाला घसा!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational