STORYMIRROR

Anita Bodke

Tragedy Others

4  

Anita Bodke

Tragedy Others

गझल

गझल

1 min
356

दाटलेल्या पावसावर प्रेम आहे!

वाहणा-या आसवावर प्रेम आहे!


सोडुनी तू दूर गेला..काय झाले?

(आजही माझे तुझ्यावर प्रेम आहे!)


सोसते त्याच्या झळा मी याचसाठी

फार माझे या उन्हावर प्रेम आहे!


ना दुखवले एवढ्यासाठी कुणाला

जीवघेण्या या जगावर प्रेम आहे!


सारखा का आठवे गतकाळ आता

निसटल्या वेड्या क्षणावर प्रेम आहे!


फक्त रूपाला तुझ्या ना भाळले मी

रे तुझ्या भोळ्या मनावर प्रेम आहे!


एवढ्यासाठीच जपते बाग आता

या कळ्यांवर या फुलांवर प्रेम आहे!


सोडले आहे कुणासाठी मला तू

सांगना आता कुणावर प्रेम आहे?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy