प्रेरणा
प्रेरणा
कसा कोणास ठाऊक
कधी कधी येतो कंटाळा
निरूत्साह अंगात भरतो
अन् मनात होतो घोटाळा
आळस शरिरात भरतो
नाउमेद करतो मनाला
उठावेसे नाही वाटत
समजावून ही स्वताला
विचाराचे माजते थैमान
बधिर करते डोक्याला
मार्गच सापडत नाही
नविन काही सुचायला
बराच वेळ जातो
मग भानावर यायला
प्रयत्न करावे लागतात
आळस झटकून उठायला
आईचे बोल अचानक
येतात कानी ऐकायला
“आळस माणसाचा शत्रू
ऊठ लाग कामाला “
अन् उत्साह एकदम
लागतो अंगात संचारायला
मनाचा करून निश्चय
करतो सुरूवात कामाला
आईचे प्रेमळ बोल
नेहमीच यावेत ऐकायला
प्रेरणा सदैव देतील
यशस्वी आयुष्य घडायला