STORYMIRROR

Sangita Algoundar

Inspirational

4.5  

Sangita Algoundar

Inspirational

***महामानव***

***महामानव***

1 min
28.6K


कोटी कोटी नमन

घटनेच्या शिल्पकारास 

युगप्रवर्तक,विश्वरत्न

भारत भाग्यविधात्यास

       क्षणही वाया न घालवता

      केले काम तासन् तास

      गरिबीतही अखेरपर्यंत

      धरला शिक्षणाचा ध्यास

घेऊनी दिन-दलितांच्या

उद्धाराचा वसा

जीवन उजळविले

अंधारात दिप जसा

  

     सत्याग्रह करूनी दिले   

     चवदार तळ्याचे पाणी

     विषमतेविरुद्ध लढूनी

     गायली समतेची गाणी

होऊनी परिवर्तनाचे अग्रदूत

समाजसुधारणा घडवली

या बोधिसत्व प्रज्ञासूर्याने

भारतभूची तेजोमयता वाढवली

    जीवन उध्दारण्या जनसागराचे

    महामानवाने दिले पंचतत्त्व

    धन्य जाहले विश्व सारे

    लाभले असे श्रेष्ठ नेतृत्व


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational