STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

भाऊबीज

भाऊबीज

1 min
240

भाऊबीज आली सण भाऊ बहिणीचा

ऋणानुबंध नाती संस्कृती परंपरेचा 

आतुरलेली बहीण येते वर्षाकाठी 

जीव लागला भावाच्या भेटीसाठी  


भाऊबीजेच्या दिवशी ओवाळीते भाऊराया 

इडापिडा जाऊ दे, ही मागणी भाऊराया

गरीब बहीण नका समजू प्रेम गरीब 

सुपाएवढे काळीज मन तिचे अजब  


तिच्या प्रेमाची सर नाही कुणाला येणार

निःस्वार्थ प्रेम, जीव भावासाठी तुटणार 

खाईल मिरची भाकर मोठ्या आनंदाने 

गुण गाईल गरीब भावाचे लई अभिमानाने  


सुख समृद्धी नांदू दे आशीर्वाद बहिणीचा 

तिचे समाधान काळ येईल भरभराटीचा 

दोन शब्द प्रेमाचे हा आधार बहिणीला द्यावा

लोभ नाही तिच्या रक्तात, मायेने जीव लावा  


संगे काही नाही आधार एक दुसऱ्यास असावा 

मायेचा झरा आयुष्यभर वाहताना दिसावा

निर्मळ पाण्याचा रे गुणधर्म प्रत्येकाने पाळावा 

भेटीगाठीचा आनंद धनापेक्षाही निराळा 

आठवण रक्ताची प्रत्येकाने कायम सांभाळा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational