STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

माणसात मी

माणसात मी

1 min
236

देव तीर्थामध्ये नाही

माणसात मी पाहतो

माणसाच्या हृदयात

कार्यरत तो राहतो


नरजन्म माणसाला

बहू भाग्याने मिळाला

विसरून उपकार  

कसा कृतघ्न तो झाला


माणसात 'मी' घुसला

देवापेक्षा मोठा झाला

माझे माझे म्हणताना

अंतकाळ बघा आला


पैसा पैसा जमा केला

तरी संगे नाही नेला

रित्या हातीच जन्मला

रित्या हातानेच गेला


दिले देवाने एवढे

तरी आणखी मागतो

पशू नाही पक्षी नाही

तरी तसा का वागतो


गुणसंपन्न एखादा

जगामध्ये सापडतो

असा विरळा माणूस

माणसात मी शोधतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational