आठवणीतील आई
आठवणीतील आई
आठवण आईची
अजरामर असते
आशीर्वादाने आयुष्य
अखंडित आनंदते
अवनीपासून आकाशी
ओढ अनोखी
अविरत ओथंबलेली
आईची आपुलकी
ओळख अस्तित्वाची
आईविना अधुरी
अंगणात आशेची
ओंजळ अपुरी
आईच्या अंताने
अश्रुधारा ओघळती
अनाथापुढे अवचित
अनेक आपत्ती
