****विरहातील हाक****
****विरहातील हाक****
1 min
13.5K
तुझ्या सहवासातील दरवळणारा गंध
आठवणींचा मधुर तो मकरंद
नयनपुष्पात केला सारा बंद
वाटे, पुन्हा भेटुनी जगावे बेधुंद
तझ्याविना जीवन झालं ओसाड रान
हिरव्या मनलतेचं सुकलेलं पान
आसुलेल्या चक्षुनाही एकच ध्यान
पाहण्यास तुज अधिरला प्राण
क्षणाक्षणांचे चित्र मग येतील नजरेत
मनामनाचे सूर जुळतील भेटीत
हास्यासह आसवे दाटतील कंठात
शब्दही मग विरतील ओठात
