काव्यांजली
काव्यांजली
निर्माण झाली
जन्मापासून माणसाची नाती
जपण्याची नीती
बाळगावी......
नावे कैक
नव्या नात्यांना मिळती
टिकवावी प्रीती
अखंडित....
नको हेवेदावे
नात्यांचे खोटे पुरावे
अखेरपर्यंत उरावे
माणुसकीचे.......
मनामनाला हवासा
प्रत्येकाने आनंदाने जपावा
नात्यातील गोडवा
आयुष्यभर.....
माणसाचे प्रेम
क्षणोक्षणी वाढत जावे
नातेबंध टिकावे
अजरामर........