STORYMIRROR

Shankar Kamble

Inspirational

3  

Shankar Kamble

Inspirational

कसा रे माणसा….??

कसा रे माणसा….??

1 min
167

असा कसा रे माणसा किती बदललास गड्या

तुझ्या स्वार्थाच्या अंगणी लोभाच्या रे पायघड्या


असा कसा रे माणसा तू रे झाला अप्पलपोटी

माती, धुळीने भरली कशी आपुलीच ओटी


असा कसा रे माणसा तुझा वाढला हव्यास

रुप्याच्या झापडीनं कसा चाले रात्रंदिस


असा कसा रे माणसा इतका झालास निबार

डोळ्यांच्या कुपितनं येई ना मायेचा पाझर


असा कसा रे माणसा तुझा आखडला हात

घर भरलेलं तुझं मात्र मन कसं रितं..?


असा कसा रे माणसा तुझा जायी पुरा तोल

वासनेच्या दलदलीत तुझा रूते पाय खोल


असा कसा रे माणसा झाला कशाला तू मोठा?

घडीभर कर विचार काय झाला तुझा तोटा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational