Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shankar Kamble

Fantasy

3  

Shankar Kamble

Fantasy

वळीव

वळीव

1 min
197


 *आला वळीव, वळीव* 

 *लय गरजत,बरसत* 

 *तहानेल्या धरतीला* 

 *नाही जराशी फुरसत* 


 *तप्त सुर्व्याच्या चटक्यान* 

 *तिचं भाजीयल अंग* 

 *वळीवाच्या रं येण्यानं* 

 *तिचा बदलला रंग* 

 *माहेरवाशीण सासरी* 

 *चालली हासत, लाजत* 

 *तहानेल्या धरतीला....* 


 *शुभ्र पाऊस धारांनी* 

 *तिचा पालटला नूर* 

 *आले आपसूक ओठी* 

 *नवलाईचे ते सूर* 

 *सनईच्या त्या सुरात* 

 *गुंफियल गोड नातं* 

 *तहानेल्या धरतीला....* 


 *मोहरल्या त्या कुशीत* 

 *लपियला एक कोंब* 

 *नाजूक, रसरशीत जणू* 

 *सोनियांची कांब* 

 *प्रेम पान्हा पाजूनी* 

 *पोशिला अंकुर मनात* 

 *तहानेल्या धरतीला...* 


 *दोन हात जोडूनी* 

 *त्यानं केला नमस्कार* 

 *धरतीच्या उपकरा* 

 *असे मानिले आभार* 

 *माझं जीवन सरू दे* 

 *तुझी थोरवी गात-गात* 

 *तहानेल्या धरतीला....* 


 *जन्मोजन्मीचं आपुल* 

 *माय लेकराचं नातं* 

 *तुझ्या आधारामुळच* 

 *जीवन माझं हे फुलतं* 

 *तुझी शिकवण घेऊन* 

 *जाईन उंच आभाळात* 

 *तहानेल्या धरतीला....* 


Rate this content
Log in