मागणे!!
मागणे!!
आभाळाला मागेन मी दान विशालतेचे
धरतीला मागणे सहनशीलतेचे
वृक्षांकडे मागेन परोपकारीता
अन नदीला सांगेन तू दे निरंतरता
सूर्या तू मला दे तुझी प्रखरता
चंद्राकडून हवीहवीशी वाटणारी शीतलता
ताऱ्यांकडून टीमटीमणारी मंद धवलता
तळपणाऱ्या, कडाडणाऱ्या विजेची विध्वंसता
फुलांकडे वाण मी मागेन सुवासाचे
फळांकडून भरून घेईन कुंभ मधुरतेचे
भिरभिरणाऱ्या फुलपाखरांची घेईन नाजुकता
कुंजवनातील कोकीळेच्या कंठातील मंजुळता
कोसळणाऱ्या पावसाकडे मागेन तृप्तता
खळाळणाऱ्या झऱ्यापरी तशीच मुक्तता
पाने, फुले, वेली तुझं ऐक काय कथीता
परोपकारातच आहे तुझ्या जन्माची सार्थकता
