STORYMIRROR

Shankar Kamble

Inspirational

3  

Shankar Kamble

Inspirational

सूर्य…

सूर्य…

1 min
343

सडे शिंपुनी दवबिंदूंचे 

मऊ मखमली तृण गालिचे

गंधित सुमने, फुले जागली

कुठून ही मंद झुळुकशी आली

केशराची बघ पखरण झाली

लालीने त्या धरा न्हाहली

तेजरथावर होऊनी आरुढ

स्वारी सूर्याची निघाली…


साऱ्यांचा हा जीवनदाता

तेज, ऊर्जेचा असे उद्गाता

सहस्त्र करे कुरवाळीता

सचेत होई तरु, लता

जागे झाले घाट नदीचे

खळखळ पाणी पाटाचे

मोहरली ती तुळस अंगणी

कुठे सूर भूपाळीचे

काकड्याच्या सुवासाने

मने बहरून गेली

तेजरथावर होऊनी आरुढ

स्वारी सूर्याची निघाली


परोपकारी रूप खरोखर

मूर्तिमंत हा असे दिनकर

तिमिर हरण्या चराचराचा

जळत राही असा निरंतर

दान देऊनी समर्पणाचे

वाण लुटूनी चेतनेचे

कणा-कणात मना मनांत

आणि भरते हर्षोल्हासाचे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational