STORYMIRROR

Shankar Kamble

Tragedy

3  

Shankar Kamble

Tragedy

फरफट...

फरफट...

1 min
191


 *दिशा अंधारल्या साऱ्या* 

 *मन सैरभैर झालं* 

 *कुठं जावू?कुणा सांगू?*

 *आता कोण असं माझं?* 


 *एका रातीतच सारं* 

 *कसं अघटित झालं* 

 *आधारच न मायेच* 

 **माझं झाडं कसं गेलं* 

  *आयवाचं लेणं गेलं*

 *सारा उतरला साज* 

 *कुठं जाऊ....* 


 **काळ्या सटवीनं माझं* 

* *कसं नशीब लिव्हल* 

 *सात जन्माच्या साथीच* 

 *गोड सपान ठरलं* 

 *आठवांचं आता डोई* 

 *लय जड झालं वझ* 

 *कुठं जाऊ....* 


 *हळदीची अंगावर ओली* 

 *हळद पिवळी* 

 *हिरव्या चुड्याची हाती* 

 *आहे तशीच झळाळी* 

 *मेंदीच्या सूगंधान मन* 

 *चुरडल माझं* 

 *कुठं जाऊ....* 


 *काय नशिबात माझ्या* 

 *वाढून ठेवलं* 

 *उभ्या आयुष्याची मात्र* 

 *आता फरफट होईल* 

 *माझी कणव न सय* 

 *आता कुणाला येईल?* 

 *कवळ्या मनाचा मोहर* 

 *पार करपून जाईल* 

 *वनात सोडुनी राणीला* 

 *दूर गेलं राज* 

 *कुठं जाऊ....* 


 *विरहाची ही आगीन* 

 *रोज जाळील मला* 

 *गूज मनीच सांगायच* 

 *राजा राहिलं तुला* 

 *आता कुठं कुठं शोधू* 

 *माझ्या पिरतीच्या फुला* 

 *तुझ्या संग जोडलेलं* 

 *माझ्या नशिबाच धाग* 

 *कुठं जाऊ....* 


 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy