स्वप्न प्रवास एका बापाचा...
स्वप्न प्रवास एका बापाचा...
स्वप्ने डोळ्यांतली
क्षितिजभर साचलेली
वाट क्षितिजाची
अडथळ्यांनी सजलेली..
अडथळ्यांच्या डोंगरावर
इच्छाशक्ती झेपावलेली
मोट इच्छाशक्तीची
जबाबदारीत बांधलेली..
जबाबदारी आपुलकीची
भावनांनी भरलेली
माळ भावनांची
प्रेमबंधनात गुंफलेली..
प्रेमबंधने मनातली
नात्यांनी जोडलेली
ओढ नात्यांची
हृदयात विसावलेली..
हृदयाची स्पंदने
मायेने उधाणलेली
डोळ्यातली माया
स्वप्नात भिजलेली..
