रुपे तुझी तेजस्वी अपार..
रुपे तुझी तेजस्वी अपार..
अल्लड-भावस्पर्शी मनाची
जणू स्वप्नांची नगरी छान..
नार नखरेल तू अफाट
सौंदर्याचीच जणू तू खाण..।।१।।
नात, लेक, सखी, अर्धांगिनी
सर्वच रूपात तू भावली..
मावशी, आत्या, आई नि आजी
बनुनी दिलीस तू सावली..।।२।।
एकाच जन्मात दडलेली
रूपे तुझी तेजस्वी अपार..
संकटांचा करती संहार
उचलुनी कुटूंबाचा भार..।।३।।
कधी तू ममतेचा पाझर
कधी तू तलवारीची धार..
लढते जिद्दीने निरंतर
न मानता कधीच तू हार..।।४।।
बनुनी तू दुर्गा, तू भवानी
जीवनात दिलास आधार..
बनुनी तू सरस्वती, विद्या
जीवनास दिलास आकार..।।५।।
