STORYMIRROR

Vishal Patil "Vishu.."

Inspirational

3  

Vishal Patil "Vishu.."

Inspirational

"हे शब्दमोती.."

"हे शब्दमोती.."

1 min
234

लावूनी लळा, जोडतात नाती

शब्दमोत्यांची या पंचक्रोशीत ख्याती ।।धृ।।


कधी हसवतात, कधी रडवतात  

कधी जिंकवतात, कधी हरवतात

कधी रुसतात, कधी रुसवतात

पण रुसल्यावर देखील तेच मनवतात ।।१।।


तलवारीची तळपती धार आहे

प्रेमाचा, मायेचा पाझर आहे

सूर्याचा लख्ख प्रकाशही आहे

शब्दमोत्यांत चंद्राच निर्मळ तेज आहे ।।२।।


बेफाम, बेधुंद वाऱ्यासारखे

चंचल, प्रवाहित नदीसारखे

ज्वलंत, भडकावू वादळासारखे  

हे शब्दमोतीच थंडगार हिम-पर्वतासारखे ।।३।।


अस्तित्व तसे सामान्यच आहे

पण जीवनात खूप महत्व आहे

किती सोपं-साधं उदाहरण आहे

शब्दमोत्यांनीच तर आपली ओळख आहे ।।४।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational