STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Inspirational

3  

मैथिली कुलकर्णी

Inspirational

गुणगान भारत मातेचे

गुणगान भारत मातेचे

1 min
239

भारत भूमी माझी माय

गाते तुझे गुणगान....

या देशाचा मजला

बहू अभिमान ।।धृ।।


भारत देश घडला

ज्यांच्या रक्तारक्तातून....

प्रजासत्ताक दिनी स्मरण

सदैव देते स्फुरण ।।१।।


तीन रंगात शोभतो

तिरंगा माझा छान....

या झेंड्याचा मजला

बहू स्वाभिमान ।।२।।


अनेक प्रांत अनेक भाग

नटली विविधता....

एकतेतून दिसे परि

अखंड हिंदुस्थान।।३।।


तुझ्या रक्षणा उभा हरेक

प्राण त्याग करून....

ऋण तुझे फेडण्यात

आम्हा बहू समाधान ।।४।।


भारत माते तुला आज जग मानतो....

उत्तुंग भरारीपुढे तुझ्या विश्व ही नमतो ।।

पवित्र भूमिची मी निवासी हाच बहुमान....

या देशाचा मजला बहू अभिमान ।।५ ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational