संकटावर मात कर
संकटावर मात कर
सहज होईल संकटावर मात
सकारात्मक विचारांची हवी साथ।।
ढसळू देवू नको आत्मविश्वास
सोडू नकोस तू मनातील आस।।
कठीण समयी हो खंबीर
पुसून टाक चेहर्यावरील भाव गंभीर ।।
आशेचा किरण चमकणार
ईश्वर येऊन साथ देणार ।।
दूर होतील चिंतेचे काळे ढग
आनंदाची पहाट होईल तू बघ।।
काम घे तू संयमाने
संकट समयी लढ तू धीराने।।
