Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gajanan Pote

Tragedy

3  

Gajanan Pote

Tragedy

वस्त्रहरण नितीचे

वस्त्रहरण नितीचे

1 min
206


काल ते शंभर होते ,आज हजारो झाले 

कौरव आज येथे माजले||

वस्त्रहरण नितीचे, मानवतेचे झाले

दुःशासन गल्लोगली दिसू लागले ||

शकुनी,दुर्योधन समाजात जन्मले

स्त्रीचे वस्त्रहरण पुन्हा यांनी केले||

आज धृतराष्ट्र हा बघू लागला

बघून मौन तो झाला||

कृष्ण आता कोणी राहीलाच नाही 

कौरव सभा वसली ठायी ठायी||

शिवरायांच्या देशात हे काय घडले 

माता बहिणींचे राखणदार हरवले ||

सरकार स्वार्थी,कायदा स्वार्थी 

आरोपींची केली जाते येथे आरती ||

शासन हे शिथील झाले 

अजब हे कायद्याचे नियम झाले ||

न्यायासाठी नाही तर 

सारे राजकारणासाठी लढू लागले 

मणिपूरसारखे किती कांड देशात झाले?||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy