मित्र
मित्र
आठवण न यावी एवढेही मित्र निष्ठूर नसावेत
मैत्रीचे बंध अतुट असावेत||
नाही भेट पण एकमेकाशी बोलावे
सुख दुःख कधीतरी विचारावे ||
दरवर्षी त्या पावसाप्रमाणे भेटावे
मित्राने मित्राला फोन करून हसवावे ||
कामाच्या व्यापात सारेच असतात
मित्र कधीच मतलबी नसतात ||
एकमेकांशी संवाद साधावा
मित्राने मित्राच्या जगण्याचा आढावा घ्यावा ||
वेळेचे देतात सगळेच बहाणे
मित्राने थांबवू नये मित्राशी बोलणे||
गजानन पोटे
अकोला
