STORYMIRROR

Gajanan Pote

Classics Others

4  

Gajanan Pote

Classics Others

माझे बाबा : आनंदाचा गाव

माझे बाबा : आनंदाचा गाव

1 min
2


आधार होता, आनंद होता,
स्वप्नांना आमच्या आकार होता...
गंध फुलांचा जसा दरवळत होता,
बाबा, तुम्ही म्हणजे आमच्या आनंदाचा गाव होता! ॥ १ ॥

करून कष्ट, सोसून दुःख,
मारून स्व-इच्छा, आम्हा दिल्या सदिच्छा...
खऱ्या अर्थाने होते तुम्ही आमचे 'कल्पवृक्ष',
आजही आठवणीत तुमच्या नकळत पाणावतात अक्ष! ॥ २ ॥

मनात चिंता, समोर अनेक प्रश्न,
तरीही आमच्यासाठी केले तुम्ही जीवाचे रान...
स्वतःच्या सुखाचा कधी विचारच नव्हता,
संकटातही बाबा, तुमचा चेहरा हसराच होता! ॥ ३ ॥

मायेची सावली होती तुमची,
केली पूर्ण तुम्ही हरएक इच्छा आमची...
तुम्ही म्हणजे सतत बरसणारा तो आनंदाचा घन,
बाबा, तुमच्यामुळेच आज सुखी जगतोय मी हे जीवन! ॥ ४ ॥

-— गजानन दशरथ पोटे, 
अकोला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics