STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Inspirational Others

3  

मैथिली कुलकर्णी

Inspirational Others

स्त्री शक्तीरूपीनी

स्त्री शक्तीरूपीनी

1 min
294

कधी रमा कधी पार्वती

प्रसंगी चंडिका ही होते....

राधा बनते कधी ती

तिच्यात मीरा भक्ती दिसते।।


बीज अंकुरते उदरी जिच्या

आयुष्य पणास लावते...

अनंत यातना सोसते ती

मातृत्व तिज शोभते ।।


मात-पित्याची लाडकी ती

सासरची ही शोभा होते....

दोन कुळ उध्दारण्यास

जीवन आपले वेचते ।।


कर्तव्य आपले निभावताना

सासू हळूच आई होते.....

मैत्रीण बनून अलगद

संस्कार सुनेवर रुजवते।।


घर उत्तम सांभाळताना

नाते सारे जपते....

तारेवरची कसरत तिची

किती जणांना दिसते?


स्त्री असतेच शक्तीरूपीनी

लीलया सारे पेलते....

म्हणूनच प्रत्येक क्षेत्रात

तिचे कार्य सिद्ध होते ।।


स्त्री शक्तीचा जागर

एक दिवसात थोडेच होते?

तिची थोरवी वर्णाण्यास

आयुष्य ही कमीच पडते।।


कर्तृत्ववान माझ्या सख्यांना

लेखणीतून सलाम करते....

मानवजातीची निर्माती तुज

शब्दसुमने मी वाहते ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational