STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Others

3  

मैथिली कुलकर्णी

Others

दिपोत्सव

दिपोत्सव

1 min
449

पणतीच्या दिव्यांनी लक्ष

उजळून जावे घर आंगण...

दिपोत्सव लेखणीतून होता

व्हावा प्रकाशमान सारा प्रांगण....


साहित्यातील सागरात या

मी इवलीशी मासोळी....

मोती बनावे शब्द माझे

गाव्या कोणी काव्य ओळी....


कधी लिहावे कधी वाचावे

पुस्तक हेचं प्राण झाले....

समर्पण हे लेखनाला

त्याचसाठी श्वास चाले....


काव्यामृत चाखूनी मजला

अतीव गोडी त्याची कळली....

अतृप्त या वेड्या जीवाची 

लेखनीशी नाळ जुळली....


नभांगणात लक्ष चांदण्या

 सप्तर्षी चे रुप आगळे.....

त्या तार्‍यासम आयुष्य माझे

उजळून जावे कैक वेगळे


जन्म मृत्यू जीवन नौका

चालवणारा भाग्यविधाता....

कार्यहोडी पार व्हावी

हेच मागणे त्यास आता


Rate this content
Log in