STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Romance Inspirational Others

3  

मैथिली कुलकर्णी

Romance Inspirational Others

एक पाऊस असाही

एक पाऊस असाही

1 min
319

एक पाऊस असाही

मनास स्पर्शून गेला....

काळजात नकळत

घर करून गेला


तुझ्या माझ्या प्रेमाची

आठवण देऊन गेला

भेट आपली शेवटची

मानत गोठून गेला

एक पाऊस असाही...


मृदगंध पावसाचा

श्वासात साठलेला

तुझ्या आठवणीत

कंठ दाटलेला

मुक्यानेच डोळे

पाणाऊन गेला

एक पाऊस असाही...


गगन ठेंगणे मज

तुझ्या प्रीतीत भासे...

बघ हेच विश्व

मला आज हासे

अर्ध्यावरी असा तू

सोडून मज गेला

एक पाऊस असाही....


 विरह तुझा मजला

आता सोसवत नाही...

डोळे अतृप्त माझे

तुझीच वाट पाही...

जीवन प्रवास सारा

आठवणीस वाहिला...

एक पाऊस असाही

मनास स्पर्शून गेला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance