STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Romance Inspirational Others

3  

मैथिली कुलकर्णी

Romance Inspirational Others

आयुष्याची संध्याकाळ

आयुष्याची संध्याकाळ

1 min
356

मी तुला अन् तू मला

साथ जन्मांतरीची...

आधाराला काठी आहे

 ही म्हातारपणाची ।।


जीवन हे सुखकर झाले

हाती हात धरुनी....

यातना ह्या सोसल्या

एकमेका पाहुनी ।।


अनवाणी हे पाय भाजले

तमा कधी नव्हती त्याची...

राजा राणीच्या संसारात

फुलली वंशवेल सुखाची ।।


पाखरे ही सुंदर आपली

बागडली अंगणात......

पंख फुटले त्यांना अन

झेप घेतली गगनात ।।


आता न उरले ध्येय कसले

ना कसल्या आकांक्षा....

थकलो आता देता देता

जीवनाची ही परीक्षा ।।


आयुष्याची संध्याकाळ

वाटते अशीच पहावी....

कवेत तुझ्या स्थिरावून

जीवन ज्योत मावळली ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance