STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Inspirational Others Children

3  

मैथिली कुलकर्णी

Inspirational Others Children

हापूस आंबा

हापूस आंबा

1 min
239

उन्हाळा येताच आयुष

मुलगा माझा बोलतो...

मामाच्या ग गावाला

नेशील कधी?पुसतो


आजोबा आजी आम्हला

 लाईवच भेटतात...

गप्पा आमच्या त्यांच्याशी

  फोनवरच होतात


आता मात्र कोकणात

आम्हा जायचंच आहे...

मजा मामाच्या गावाची

अनुभवायची आहे


आंबा हापूसचा आम्ही

पोट भरून खाणार...

समुद्राचा तो किनारा 

तृप्ततेने बघणार


अख्खा वर्ष झाला तरी

मामा कोणाला भेटेना...

 का ग त्याला आई

आठवण माझी येईना?


वाटतंय कोरोनाला

लाथच अशी मारावी..

पृथ्वीवरून त्याची

हकालपट्टी करावी


खरं सांग आई मला

कमी होईल हे सारं?

 अगं ...घरात बसून 

कंटाळाच आला फार!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational