STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Inspirational Others

4  

मैथिली कुलकर्णी

Inspirational Others

अधिकार-स्त्री जन्माचा

अधिकार-स्त्री जन्माचा

1 min
223

चूल, मूल पाहताना

नको स्वतःस विसरू...

नरी तु अबला नव्हे

नको ग वेड पांघरु ।।


जाग जननी आता तू

 बंधनातून सावर....

हक्क हा तुझाही आहे

जन्मणाऱ्या बाळावर ।।


सांग बाळाच्या बाबाला

जन्म तिचा"अधिकार"

बाळ करेल आपले

दोन कुळाचा उद्धार ।।


कन्या पुत्र समानता

दोघा शिकवू सारखे....

अंश ते आपलेच ना

नका करूच पोरके ।।


पुरे झाला अट्टाहास

पुरुष प्रधानतेचा....

नका करू प्रयत्न हा

तुम्ही स्त्री भ्रूणहत्येचा ।।


पाप मुलीच्या हत्येचे

आता थांबऊया सारे...

कास विज्ञानाची धरू

वाहू दे यशाचे वारे ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational