STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Inspirational

3  

मैथिली कुलकर्णी

Inspirational

दिवाळी

दिवाळी

1 min
351

द्वारी लावता एक पणती

प्रकाश त्याचा साऱ्या अंगणात....

आनंद उत्साह दिवाळीचा

लहान थोर साऱ्यांच्या मनात...


प्रज्वलित दीपोत्सव हा

दिन तेजोमय आला ....

नयनरम्य दृश्य साजरे

प्रकाशमान विश्व झाला....


प्रकाशात देखण्या या

न्हाऊन गेले जीव सारे....

दिपावलीच्या शुभेच्छा चे

वाहू लागले आहे वारे....


अभिष्टचिंतन आज माझे

 साऱ्या मानवजातीला....

सुख समृध्दी अखंड लाभो

हेचं साकडे लक्ष्मीला.....


अरुणोदय होऊनी त्याचा

अवनीवर पसरे केशरगंध....

दिवाळीत जपू या आपण

माणुसकीचे रेशीमबंध....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational