STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Others

3  

मैथिली कुलकर्णी

Others

मृदुगंध(अष्टाक्षरी)

मृदुगंध(अष्टाक्षरी)

1 min
166

सप्तरंगी इंद्रधनु

ढग आकाशी दाटले...

सर येता पावसाची

मृदुगंध मी घेतले


 शालू हिरवा नेसुनी 

छान नटली अवनी...

फुललेल्या मोगऱ्याचा

 दरवळे गंध मनी....


 चाखताना मकरंद

खग करती विहार...

 पहाटेच्या समयीला

भासे धुक्याचा प्रहार


उठ भास्करा तू आता

 धरणीच्या कुशीतून....

घाली तूज नमस्कार

माझ्या "काव्यगंधा"तून


स्मृतीगंध जागताना

होई मन मोरपीस...

क्षण आनंदाचे यावे

वाटे मज रात्रंदिस


Rate this content
Log in