Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Govind Ghag

Inspirational

3  

Govind Ghag

Inspirational

झाडांच्या कुशीतल गाव

झाडांच्या कुशीतल गाव

1 min
236


द-या खो-यातील झाडांच्या कुशीत

दडलेलं ते इवलंसं छोट गाव होत!

टोलेजंग इमारतींच्या पसा-याच्या

शहराकड ते केवीलपणे बघत होत!!

त्याच मन कशामुळ जळत होत

ते त्याच्याच मनाला माहित होत!!

द-याखो-यातील झाडांच्या कुशीत

दडलेलं ते इवलसं छोट गाव होत!!१!!

कुठतरी झोपडीत काजळी ओकीत

दिवा मिणमिणत जळत होता!!

विजेच्या दिव्यांच्या झगमगाटाने

त्याचा चेहरा शरमून गेला होता!!

उजेडाच रोपट तर त्यानेच लावल होत

पण गर्विष्ठ विजेने ते दुखवल गेल होत!!

द-याखो-यातील झाडांच्या कुशीत

दडलेलं ते इवलसं छोट गाव होत!!२!!

रात्री गाव अंधारात झाडीत गुडूप व्हायच

गाव आहे की नाही हे माहिती पडत नव्हत!!

कधीतरी कुत्र्यांच्या कळवंडीन

तिथ गाव आहे अस कळत होत!!

शहरा पुढ कसतरी ते तग धरुन त्यान 

गुरढोर, गोठे,ओढ्यांनी गावपण जपल होत!!

द-याखो-यातील झाडांच्या कुशीत

दडलेलं ते इवलसं गाव छोट होत!!३!!

चिखलराड्याच्या अरुंद पाणंद वाटा

एकांतातून गजबजाकडे वाहून नेत होत्या!!

धूर, धूळ,गोंगाट डांबरी सडकां भाजून

जीव नको नकोसा करून सोडत होत्या!!

चार घास खावून सुखी झोपण्याच जीवनाची

अन् निसर्गाची बसलेली घडी विस्कटून

मृत्युला जवळ ओढून आणणारा कोण ?!!

अस द-याखो-यातील झाडांच्या कुशीत

दडलेलं ते इवलसं छोट गाव विचारत होत!!४!!

***************************************


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational