****औंदा पावसान दगा दिला***(उन्हाळा)
****औंदा पावसान दगा दिला***(उन्हाळा)
औंदाच्या साली पाऊस लईच कमी पडला
हिवाळा संपायच्या वक्तालाच उन्हाळा आला!!
रानाला पडलेल्या भेगा नजरेत पडल्यावर...
बळीराजाचा जीव नको इतका कळवळून गेला!!
औंदा पावसाने दगा : देऊन आमचा घात केला!!१!!
विहीरी, नदी,नाले, सगळेच एकदम आटून गेले
पाण्याच्या दुर्भिक्षाने पाखरांचे थवे ही कमी झाले!!
शेळ्या बक-यांचे कळप रानोमाळ भटकू लागले
बैलांच्या तोंडच्या फेसान बळीराजा कळलळला!!
औंदा पावसान दगा देऊन आमचा घात केला!!२!!
झाड झुडपे बोडकी झाली रान सगळी ओसाड पडली
पाखर आणि मुकी जनावर सावलीला पारखी झाली!!
कुठतरी बाभळीच्या झाडावर बसून होला घुमत होता
त्याच्या घुमण्यान बळीराजाच्या काळीजाला तडा गेला!!
औंदा पावसान दगा देऊनआमचा घात केला!!३!!
पांढ-या फटक आभाळाकड बघत कळ्वळून म्हणाला
काय अपराध घडला म्हणून तू सत्व परीक्षेवर उतरला!!
अरे आम्हांला छळणा-या उन्हाळ्या तू लवकर जा
अन इकडे धाडून दे आमच्या साठी पावसाळ्यला!!
मिळू दे दोन घास भुकेने तडफडणा-्या जगाला
ओंदा पावसान दगा देऊन आमचा घात केला!!४!!
