STORYMIRROR

Govind Ghag

Inspirational Others

3  

Govind Ghag

Inspirational Others

करा प्रथम प्रेम झाडावर (पर्यावरणावर कविता)

करा प्रथम प्रेम झाडावर (पर्यावरणावर कविता)

1 min
316

वड, पिंपळ ,सावर, लिंब,चिंच अन‌ उंबर!

फांदी फांदीवर लगडले उंबरांचे झुंबर!!

दृष्य नयन मनोहर पहात रहा पोटभर!

मानवा तुला आमचे वरदान‌ निऱंतर!!१!!


पाहूनी लाकूड तोड्यास लागे मरणाचा घोर

नको करू रे माझ्या अंगावर कुऱ्हाडीचा वार!!

नको तोडू आम्हां हात जोडून विनंती वारंवर

मानवा तुला आमचे वरदान निरंतर!!२!!,


जर तोडशील तू आम्हां ,कसे पोसू प्राणीमातरा

कशीदेवू तुला छाया आणि पक्षांना निवारा !!

आम्हां विना कशी कोसळेल पावसाचीजलधार

नाही प्राणवायू, ना धान्य मग जगशील कशावर

मानवा तुला आमचे वरदान निरंतर!!३!!


सुकतील नदी नाले अन रान पडतील ओसाड

सूर्याच्या आगीन घशाला बघ पडेल कोरड!!

गुरढोर पोरबाळ भुकेन तडफडून मरतील

मग मेल्यावर सगळे कोणासाठी तू जगणार!!

झाडतोड करून नको करू सगळ जग उजाड

लाव झाडे, साठव पाणी, जगा बनव हिरवेगार!!

मानवा तुला आमचे वरदान निरंतर!!४!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational