STORYMIRROR

Govind Ghag

Inspirational

3  

Govind Ghag

Inspirational

बाप कर्मयोगी दानशूर कर्ण

बाप कर्मयोगी दानशूर कर्ण

1 min
222

मला एक सुख देण्यासाठी

त्याने शंभर दुखे भोगली!!

पण जाताना विरही दु:खाची

एक जबरदस्त वेदना दिली!!

दु:ख भोगणाराअन् सुख देणारा

तो माझा मायेचा बाप होता!!

कलीयुगातला माया देणारा तो

निःस्वार्थी दानशूर कर्ण होता!!१!!


जोवर आम्ही त्याच्या सहवासात होतो

तोवर सर्व सामान्यसारखा.बाप होता!!

अद्रुष्यपणे तो कुटुंबाचाआधारस्तंभ होता

पण आम्हा मुढांना त्याचा गंध कुठ होता‌!!

मग तो गेल्यावर सांगायला बापच नव्हता

कलीयुगातला माया देणारा तो

निःस्वार्थी दानशूर कर्ण होता!!२!!


त्याची निस्वार्थी माया माझे आस्तित्व होते

त्याचे आईसम ममत्व माझे जीवनसत्व होते!!

दुमत नाही माझे, जन्मदात्री ही खरेचअसते आई

पण बाप म्हणजे जीवनाच्या वाटेतली गर्द आमराई!!

बाप जगात बोट धरुन चालवणारा वाटाड्या होता

तर तो मायाळू दुर्लक्षित, निःस्वार्थी कर्ण होता!!३!!


मूकपणे टोमणे पचवित आम्हा पोसणारा तुकोबा

तर कलीयुगातील विष पचविणारा भोळा शंभू होता!!

ज्ञानोबा तुकोबांच्या वारकरी सांप्रदायाचा पाईक व

जीवनाचा खरा मार्ग चोखळणारा वारकरी होता!!

कलियुगातील माया देणारा तो

निःस्वार्थी दानशूर कर्ण होता!!४!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational