बापाची ती आभाळमाया
बापाची ती आभाळमाया
बापाची ती आभाळमाया
बाप वटवृक्षाची छाया!!
बाप जीवन तारणारे तारू
बाप संसार रथाचा वारू!!
कुटुंबासाठी झिजवी काया
बापाची ती आभाळमाया!!१!!
बापाचा तो प्रेमाळू लळा
न संपणारा तो जिव्हाळा!!
भल्यासाठी सदा उतावीळ
त्यासाठी अहोरात्र तळमळ!!
घोंगावत येता संकटाची छाया
दूरवर सारीतो करुनी किमया!!
बापाची ती आभाळमाया!!२!!
पोशी सर्वां दाणापाणी भरवूनी
स्वत:चे तन,मन,धन,झिजवूनी!!
मायेपोटी पचवित अपमान
बाजूला सारीते स्वामिमान!!
बापाची ती आभाळमाया!!३!!
बाप जन्मदाता पुत्र ,पुत्रींचा
भाग्य घडविणारा लेकरांचा!!
बाप संस्कारांची सुफल भूमी
मुखातून पाझरे संस्कारवाणी!!
ज्याने का समजा बाप त्यागीला
त्याने संस्कार आदर्श गमावला!!
हरएक संकट टाळण्या धावून येते
बापाची ती आभाळमाया!!४!!
