*श्रावण आला श्रावण आला*
*श्रावण आला श्रावण आला*
***********************
श्रावण आला श्रावण आला
आषाढाचा निरोप घेवून आला!!
नभी कृष्ण ढगांचा डाग पसरला
वीजेने लखलखता सूरा फिरवला!!
मुसळधारी सरी धरतीवर बरसल्या
पत्र्याचा ताशा तडतड वाजू लागला
श्रावण आला श्रावण आला!!१!
हिरवागार शालू धरतीने पांघरला
गळी धबधब्यांचा हार विलसला!!
नदी नाला तुडुंब भरुन वाहू लागला
चघाळ ,पाचोळा सोबत आणला!!
गढूळ पाण्याने धुराळा उडवला
पक्षांचा थवा स्वैर उडू लागला !!
श्रावण आला श्रावण आला!!२!!
गुरेढोरे माळारानी बागडू लागली
हंबरुन आनंद व्यक्त करु लागली!!
गुराखी पाव्याचे स्वर आळवू लागला
पोरांचा विटीदांडूंचा डाव रंगला!!
बळीराजाचा आनंद ओसंडू लागला
सुगीची स्वप्ने डोळ्यात रंगवू लागला!!
श्रावण आला श्रावण आला!!३!!
थकून पावसाची रीपरीप थांबते
काळे आभाळ निवळून निघते!!
सूर्यनारायण हास्यमुखे अवतरे
किरणे आपली धरतीवर पसरे!!
इंद्रधनुने सप्तरंगी कशिदा काढला!!
सगळीकडे आनंदी आनंद पसरला
श्रावण आला श्रावण आला!!४!!
भाद्रपदाचा निरोप घेई जड मनाने
वदे भाद्रपदा तूज वरदान सणांचे!!
आमंत्रण दे तू गौरी अन गणरायांना
वर माग सुखी ठेवण्या या लेकरांना!!
निघतो मी माझ्या घरी परतण्याला
पुन्हा मी भेटेल तुला याच वेळेला!!
भाद्रपद आला श्रावण गेला श्रावण गेला!!५!
************************************
