बनलंय आयुष्य क्षणाक्षणांनी
बनलंय आयुष्य क्षणाक्षणांनी
बनलय हे आयुष्य प्रत्येक क्षणा क्षणांऩी
तेच आयुष्यही झिजतय कणा कणांनी!!
आयुष्याचा इमला उभा करण्यासाठी
कणा कणांना सांधलेय या क्षणा क्षणांनी!!
बनलय हे आयुष्य प्रत्येक क्षणा क्षणांनी!!१!
गेलेला क्षण हा ना परत मागे फिरण्याचा
येणारा क्षण ही नाही काही भरवश्याचा!!
जीवनीआनंदी वलय साकारलय या क्षणांनी
जीवनी दुखही कमी जादा केलय याच क्षणांनी!!
बनलय हे आयुष्य प्रत्येक क्षणा क्षणांनी!!२!!
मैत्री वा दुष्मनी घडते याच दुर्मिळ क्षणातून
विरहानंतर मिलनही याच प्रणयी क्षणातून!!
सन्मार्गाचे धडे देणारे गुरुवर्य असती हेच क्षण
ज्ञानोबा तुकोबांना भक्तित रमविले याच क्षणांनी!!
बनवलय हे आयुष्य प्रत्येक क्षणा क्षणांनी!!३!!
यशाकडून अपयशाकडे फेकणारे हे क्षण
जीवनाच सोन अन मातेर करणारे ही हेच क्षण
विश्व निर्मितीही घडवून आणली विश्व कणांनी
अन् विश्व विनाशही घडे मंदगतीच्या या क्षणांनी,!!
बनलय हे आयुष्य प्रत्येक क्षणा क्षणांनी!!४!!
