STORYMIRROR

Govind Ghag

Others

3  

Govind Ghag

Others

अनुभवाचा मास्तर (बाप)

अनुभवाचा मास्तर (बाप)

1 min
191

बाप नावाचा एक माणूस असतो

मनात पापाचा लवलेश नसतो!!

वरून राकट आणि निबर असतो

पण मनातून फणसाचा गर असतो!!

बाप नावाचाएक माणूस असतो!! १!!


जरी वरून खरबरीत दिसत असल

तरी त्याच्या उलट आतमधी असत!!

त्याच मन कळण इतक सोप नसत 

त्यासाठी बापच व्हाव लागत

तेंव्हाच बाप कळायला लागतो!! 

बाप नावाचा एक माणूस असतो!!२!! 


कळत झाल की मूल बापामाग धावत 

त्याला जगण बापाकडून शिकायच असत!! 

अनुभवाचा खरा मास्तर बापच असतो 

आयुष्यातले खाच खळगे तोच दाखवतो!! 

संकटातून निसटाण्याचा सल्ला तोच देतो

तो बाप नावाचा हा माणूस असतो!! ३!! 


घरच्या संसाराचा गाडा तोच रेटीत असतो

घरात त्याच्या शिवाय कर्ता माणूस नसतो!! 

संकटांच्या वादळाला सदा तोंड देत असतो

एवढे करूनही जगाच्या द्रूष्टीने तो एक!! 

नजरेआडचा अस्तत्वहीन उपेक्षीतअसतो

तो बाप नावात हा दडलेला माणूस असतो!! ४!! 


आई जगातील महान शक्ती आहे यात शंकाच नाही

पण बाप त्याच तोलामोलाचा यातही शंका नाही!!

भगवान विष्णूूना बाप मानून मान देतच असतो

मग आपल्या बापाला महान मानायला का कचरतो

हाच उपेक्षित बाप नावाचा माणूस असतो!! ५!! 


Rate this content
Log in