STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

नवा जन्म...

नवा जन्म...

1 min
211

स्वार्थासाठी नाही जगलो

नि मुळीच जगणार नाही,

माणुसकी सोडून मी

मुळीच वागणार नाही...


उपकाराची ठेवीन जाण

उगीच माजणार नाही,

स्वाभिमानाने जगावे जरुर

लाचारी साजणार नाही...


गर्व नसावा मुळीच कुणा

भरवावा घासातला घास,

आपलं परकं नको बघाया

लावावा जीव जिवास...


भरोसा करावा जरुर

झाला तरीही धोका,

आयुष्यात नको कधीच

पुन्हा त्याच चुका...


जगाचं द्यावं सोडून

आपणच असावं भलं,

अपेक्षा नकोच मुळी

आपलंच होतं वाटोळं...


साऱ्यांच्याच कामी यावं

असाच जन्म हवा,

जगाच्या कल्याणासाठी मज

नवा जन्म हवा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational