जीवन एक संघर्ष
जीवन एक संघर्ष
आत्यंतिक यातना
अपरिमित दुःख
माणसांच्या नशिबात
आहे कुठे सुख...
प्रसवाच्याही वेदना
मरणाचेही सुतक..
जगण्यासाठी लढाई
संघर्षही अथक..
चेहऱ्यावरती हसू
पाठिवरती वळ..
संघर्षाच्या डोहाला
ना काठ ना तळ..
रोज रोज मरमर
थोडाफार उत्कर्ष...
माणसाठी नेहमीच
जीवन एक संघर्ष...
