माहेरवाशीण
माहेरवाशीण
1 min
679
दिवाळसणी आल्या कुणी
माहेरवाशिणी चौघीजणी
चौघीजणींचा जमला मेळ
जुन्या आठवणी, नवा खेळ
पेटतील पणत्या, पेटतील वाती
जमेल मैफल प्रत्येक राती
हसतील, बसतील बोलतील जरा
मनाचे कप्पे खोलतील जरा
थोड्या गप्पा थोडी गाणी
प्रत्येक ओठी वेगळी कहानी
सरसर सरतील दिवस सणाचे
ऊरतील काही प्रश्न मनाचे
येईल मुराळी होईल पाठवणी
राहतील काही ओल्या आठवणी
