STORYMIRROR

Digambar Badad

Inspirational

3  

Digambar Badad

Inspirational

अंतर्मनातील वेदना

अंतर्मनातील वेदना

1 min
372

माणसांच्या वागण्यावरून

लागत नाही मनाचा ठाव...

चेहऱ्यावर दिसत नाहीत...

खोल अंतर्मनातील घाव...


चालता बोलता अगदीच 

आपणांस दिसतात किती मस्त...

कोण जाणे हीच माणसं 

आतून असतात किती अस्वस्थ..


वेदनाही असतात मुक्या...

अनेकदा चेहऱ्यावर दिसत सुख..

खोलवर काळजात जखमा किती

किती भरलेले असते दुःखं...


व्यक्त होऊ..बोलू जरासे... 

देऊ भावनांना मोकळी वाट..

प्रत्येकाच्या जीवनात येणारच

कधीतरी अवघड वळण घाट...


जीवन नाही पुन्हा कधीच 

जाणतोच आपण सारे..

एका क्षणाला रोखले पाहिजे

अस्वस्थ मनातील वादळ वारे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational