#निष्ठा
#निष्ठा
हरिनामाचा गजर करीत चालली वारी
याची डोळा याची देही पहाया पंढरी
मूक श्वान तो संगे मालक
मजल दरमजल चाले सोबत
प्रेम तयांचे विठुरायावर
नाद' माउली 'धन्याबरोबर
लोट गर्दीचा उसळत गेला
वाढले अंतर तो हरवला
नजर शोधितसे धन्याला
सैरभैर झाले त्या जीवाला
मूक जरी तो असे जिद्दीचा
प्रवास एकटा करी परतीचा
पूर्ण करून ती वारी
सत्काराचा होई मानकरी
प्रा. सौ. नलिनी लावरे
