कन्यादान
कन्यादान
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
घरात जन्माला येते ती कन्या
होऊन जाते आई बाबांची दुनिया
जणू काही कळीच उमलते
त्या रोपाचे सौंदर्य अधिक खुलविते
कळी हळूहळू उमलत जाते तशी
आई वडिलांचा चिंता ही जन्म घेते
वेळ येई सुकन्या सासरी जाण्याची
परीचे कन्यादान करण्याची
मिळावे तिला योग्य तो वर
सांभाळावे तिनेही स्वतःचे घर
असले माहेरापेक्षा सासर गोड
कन्यादानंतर ही राहते माहेर ची ओढ
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
