वेळेने शिकवलं
वेळेने शिकवलं
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वेळ शिकवत मानवाला
कसे जगायचे, आयुष्यात
येणाऱ्या त्या संकटाना
कसे जायचे सामोरे
आई वडील आद्य गुरू
शिकवते आयुष्याचे धडे
गुरुजन देती जग ज्ञान
वेळ शिकवी जगी कसे जगायचे
वेळ दाखवी आपल्यात
असलेल्या परके सारे
परक्यात असलेली शत्रू ता
ठेवून असलेले लोक भारी
वेळ देई आनंद अनुभव मोठा
वेळच देई एकांताचा दुखवटा
वेळ दाखवी यश अपयश
असेच दावी उतार चढाव
वेळेसोबत करी जो
संकटांचा मुकाबला
ठरी तोच यशस्वी
आपल्या जीवनात
वेळ सर्वात मोठा असे गुरू
नियमित आपला प्रवास राहो सुरू
वेळेसोबत नको हेवे दावे
आपणच आपले मित्र बनावे.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
