सावित्री बाई फुले
सावित्री बाई फुले
आम्ही सावित्रीच्या लेकी
दाखऊ तुज सम धाळसाची येकी
पेटऊ लाखो मनात ज्योती
हिच महाराष्ट्राची ख्याती
कोणी बदलल्या ना तेव्हाच्या रिती
सांभाळतअसती महीलाचुलमूल किती
महिलांन प्रती मनात प्रथेची कटू निती
मना मनात पेटऊ आज क्रांती ज्योती
तुम्हां वानी सर्घष करावा नाही लागत
न शिकून कोणाचंही नाही भागत
तुम्हा संघर्षाला दुनिया लागली बघत
बुद्धीवंतही सावित्रीच्या चरणवरती झुकत
छळले तुज समाज प्रथेने किती
धन्य धन्य फुले दांपत्याची रणनीती
सावित्री माई तुझे गुणगान गाऊ किती
तुझ्याच पायी आज महीला राष्ट्रपती
गो. रा.इंगळे
